दिनांक 7 सप्टेंबर रोजी 6.30 वाजेच्या दरम्यान भागी येथे फिर्यादी रवींद्र सराटे हा गावातील राहणारा आरोपी मोहित भलीन याचे घरी भाजली मच्छी घेण्याकरिता गेला असता आरोपी याने फिर्यादीस घरातील चुलीजवळील लोखंडी फुकणीने डाव्या डोळ्याचे वर कपाळावर मारून जखमी केले सदर फिर्यादीची तोंडी व वैद्यकीय अधिकारी यांच्या रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा देवरी पोलिसात नोंद करण्यात आला आहे.