मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर राहता येथील बस स्टँड परिसरातदिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता विखे पाटील समर्थक त्याचप्रमाणे मराठा समाज बांधवांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे. गेल्या पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले असताना आज सरकारच्या वतीने उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांचे उपोषण सोडले आहे.