सावरटोला येथे शतकानुशतकांपासून चालत आलेल्या पारंपरिक प्रथेनुसार यंदाही पोळ्यानंतर पाडव्याच्या दिवशी पहाटे चार वाजता मार्बत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. परंपरा अबाधित ठेवत गावातील हौशी युवक व नागरिकांनी हनुमान मंदिर परिसरात भव्य मार्बत प्रतिमा उभारली. संपूर्ण गावातून बँड व डीजेच्या गजरात “जागे मार्बत”, “ढेकूण मोंगसा घेऊन जा मार्बत” या जयघोषांनी उत्साहाचे वातावरण रंगले मिरवणुकी दरम्यान प्रत्येक घरापुढे मार्बलची पूजा करून स्वागत करण्यात आली. शेवटी मार्बल गावाच्या वेशीवर नेऊन टाकण्यात आली