Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
शहरातील आगारातून वाळूज-पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस प्रवासादरम्यान एका महिलेचे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबारा ते दीड वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.