जालना जिल्ह्यातील जेष्ठ साहित्यिक आणि कलावंतानी मानधन योजनेसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सदस्य उदयसिंग राजपूत यांनी रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजता केलंय. शासनाच्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाअंतर्गत राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेसाठी सण 2024-25, व 2025-26 या वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी लिंक तयार केली आहे.