मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज यवतमाळ जिल्ह्यात विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. सुमारे ३३५ कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यवतमाळ डिस्ट्रिक्ट डॅशबोर्डच्या माध्यमातून योजनांचा आढावा घेणे सोपे होणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. मात्र, वास्तविक परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे स्थानिक जनतेने स्पष्ट केले असून गुरुदेव युवा संघटनेने मुख्यमंत्र्यांचे दौऱ्याचा जाहीर निषेध केला आहे.