हेल्मेट-सीटबेल्टशिवाय वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, विना नंबरप्लेट गाडी चालविणे... अशा अनेक छोट्या वाहतूक नियमभंगांचे प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्याची संधी पुणेकरांना बुधवारपासून शनिवारपर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत मिळणार आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगांच्या दंडांमध्ये तडजोडीने जास्तीत जास्त सवलत दिली जाणार आहे.