नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) सरचिटणीस नंबला केशवराव ऊर्फ बसवराज याला सुरक्षा दलाच्या जवानांनी २१ मे रोजी चकमकीत ठार केले होते. आता या चळवळीचे सूत्र जहाल नक्षल नेता थिप्पारी तिरुपती ऊर्फ देवजी (६१) याच्याकडे सोपवण्यात आले आहे. मंगळवारी यावर शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.