पारडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 10 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता दिल्या माहितीनुसार, ट्रक मधून तुरीच्या डाळीचे कट्टे चोरणाऱ्या ट्रक चालकाला पारडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला खेप पोहचविण्यासाठी पाठविले असता आरोपीने मधातच ट्रक उभा करून आपल्या साथीदारासोबत मिळून ही चोरी केली आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिली आहे.