आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या सुमारास मुंब्रा येथे समाजवादी पक्षाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला समाजवादी पक्षाचे कळवा मुंब्रा तालुका अध्यक्ष अब्दुल मन्नान यांनी संबोधित केलं. यावेळी अब्दुल मन्नान यांनी मुंब्रा शहरातील शाळा आणि महाविद्यालयांवर आरोप केले आहेत. मुंब्रा शहरात शाळा आणि महाविद्यालय शिक्षण माफिया बनले असून शिक्षेच्या नावाखाली जनतेची लूट केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.