उच्च शिक्षित मुलांमुळे वडीलाला दारोदारी फिरावे लागणारी दुर्दैवी अवस्था, आत्माराम थेटे यांनी मांडली न्यायाची मागणी .. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तगरखेडा गावातील आत्माराम धनाजी थेटे (वय 68) यांनी आपल्या उच्च शिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम मुलांमुळे दुःखाची गोष्ट उघड केली आहे. अनेक वर्षे कष्ट करून लाखोंची शेती, सोने-चांदी आणि प्रॉपर्टी जमवून मुलांसाठी स्थिर भविष्य निर्माण करणाऱ्या आत्माराम थेटे यांना आता त्यांच्याच पत्नी व दोन मुलांकडून मारहाण व छळ सहन करावा लागत आहे