रिपब्लिकन सेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर व ॲड. अमन आंबेडकर उपस्थित राहणार असल्याची माहिती कामगार नेते श्रीशैल गायकवाड यांनी मंगळवारी दुपारी 1 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली.