तेलंगणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, याचा परिणाम म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि भामरागड तालुक्यांमध्ये संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज आढावा बैठक घेऊन महसूल, पोलीस आणि इतर संबंधित विभागांना विशेष सूचना दिल्या आहेत.