राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुस्कान झाले आहे.त्यामुळे नुस्कान ग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत शुक्रवारी सायंकाळी राहुरीचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे.