हिंगणा मतदार संघातील दवलामेटी ग्रामपंचायत समोर श्री प्रकास मेश्राम हे २ जून 2025 पासून आमरण उपोषणावर बसले होते. दवलामेटी येथील ग्राम विकास विभागाच्या जागेवर काही नागरिक 30 वर्षा पासन राहत आहे. त्यांना त्या जागेचे कायम पटटे मिळावे याकरिता मंत्रालयातून परवानगी घेवून NOC अद्याप मिळाली नसल्याने श्री प्रकाश मेश्राम यांची तब्येत खालावत चालली होती. म्हणून त्यांच्या उपोषण स्थळी पोहचून त्यांना आश्वासन दिले की आपल्याला कायम पट्टे मिळण्यासाठी प्रश्न शासन दरबारी लावून लवकर सोडविण्यात येईल.