आयुष कोमकर खून प्रकरणात आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.गुन्हे शाखेने आंदेकर यांच्या पुण्यातील घरावर छापा टाकून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला. यात ७७ तोळे सोन्याचे दागिने, अडीच लाखांची रोकड, चांदी, मोटार आणि जमीन व्यवहाराशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे मिळाली.