दि. 22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला असून, कारंजा येथे दि. 03 आक्टोबरला मॉ दुर्गेला निरोप देण्यात आला. त्या अनुषंगाने दुपारपासून विसर्जन मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली होती. कारंजा शहरात 35 सार्वजनिक नवदुर्गा मंडळाकडून नवदुर्गेची स्थापना करण्यात आली. परंतू विसर्जन मिरवणूकीत 25 सार्वजनिक मंडळ सहभागी झाले होते.