Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
मंगळवारी सकाळी फोन घरी ठेवून कुणाल बाहेर पडला. बराच वेळ झाल्याने तो घरी न परतल्याने त्याची आई त्याचा शोध घेत असताना, गावाजवळील संतोष भंडारी यांच्या शेतात बाभळीच्या झाडाला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत माहिती मिळताच, गंगापूर ठाण्याचे पोह. मनोज घोडके व मेजर गुंजाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर कुणालचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. सायंकाळी कुणालच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी आहेत.