कुईवाडी रेल्वेस्थानकात ५ वर्षीय मुलीला बापानेच निर्दयीपणे मालगाडी खाली ढकलून दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली, तर वडिलांनी देखील त्याच मालगाडीखाली जीव देण्याचा प्रयत्न केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी रात्री ७.४५ वा. सुमारास स्थानकात प्लॅटफॉर्म क्र. २ वर घडली. याबाबत ज्ञानेश तुळशीदास राऊत (रा. आर.पी. एफ बॅरेक, कुईवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यावरून वडील उमेश विश्वनाथ चव्हाण यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.