2 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील दयानंद पार्क जवळ उघड्यावर दारू पिऊन युवकांनी गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. यामध्ये एक युवक रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी हातात विदेशी दारू घेऊन पीत आहे आणि अश्लील शब्दात शिवीगाळ देखील करीत आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. या युवकावर कार्यवाही व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.