आज बुधवारी दुपारी २ च्या सुमारास शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळ उपसमितीने गेल्या तीन महिन्यांत एकही बैठक घेतली नाही. मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर ही समिती आझाद मैदानात चर्चेसाठी गेली. यापूर्वी सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला नव्हता का? त्यामुळे सरकारच्या 'जीआर' चे संपूर्ण श्रेय मनोज जरांगे व त्यांच्यासह संघर्ष करणाऱ्या मराठा बांधव आणि मुंबई उच्च न्यायालयाचे आहे.