गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार हिंदू समाजाला एकसंध ठेवण्यास सक्षम आहेत. ओबीसी समुदायाच्या कोट्यातील एक टक्काही कमी न करता मराठ्यांना आरक्षण दिले जाईल, असेही मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.