23 ऑगस्टला दुपारी दोन वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार ऐतिहासिक वारसा आणि लोकभावनांच्या संगम असलेल्या नागपूरचा मारबत उत्सव आज विशेष रित्या गाजत आहे. या उत्सवात शहरातील विविध मंडळातर्फे समाजातील ज्वलंत प्रश्नांवर प्रहार करणारे बडगे काढण्यात आले आहे. यावर्षीचे बडगे दहशतवाद महागाई भ्रष्टाचार स्मार्ट मीटर व्यसनाधीनता अशा विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले.