सोनाळा वन परिक्षेत्र अधिकारी ए. एन. बावने यांनी ९ सप्टेंबर रोजी अंबाबरवा अभयारण्याच्या पिंगळी बिट बफर क्षेत्रात अवैधरीत्या मेंढी चराई करतांना १८० मेंढ्यासह मेंढपाळ नंदु सोनाजी डोमाळे याला तााब्यात घेतले.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून नंदु सोनाजी डोमाळे विरुद्ध सोनाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती ११ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.