मनोज जरांगे पाटील यांच्या पाच दिवसीय उपोषणाचा राज्य सरकारने मान्यता देऊन यशस्वी समारोप झाला. त्यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. हैदराबाद गॅझेटचा समावेश असलेल्या या निर्णयाने मराठा समाजात मोठा आनंद पसरला आहे. पारनेर बस स्थानक परिसरात फटाके फोडून गुलालाची उधळण करत डीजेच्या निनादात जल्लोष साजरा करण्यात आला.