राहुरी तालुक्यातील गणेगाव शिवारामधे आज मंगळवारी भल्या सकाळीच कोबरणे वस्ती परिसरात बिबट्याच्या बछड्याचे नागरिकांना दर्शन झाल्याने शेतकरी वर्गात घबराहट पसरली आहे. या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बिबट्यांचा मुक्त संचार आहे. अनेक वन्य प्राण्यांसह पाळीव प्राण्यांवर देखील बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातच आता बिबट्याचे बछडे आढळून आल्याने पुन्हा एकदा शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.