दि. 23 ऑगस्ट रोजी सायं.5 वाजेच्या सुमारास कटंगी येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तत्पूर्वी गावातून भव्य ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.पोळा हा उत्सव बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव आहे.वर्षभर शेतात राबणाऱ्या आपल्या बैलांना धन्यवाद मानणारा हा सण गोंदिया जिल्ह्यातील कटंगी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भरलेल्या पोळ्यात विविध प्रकारे सजविलेले बैल आकर्षणाचे केंद्र ठरले.कटंगी येथे भरलेल्या पोळा उत्सवात मोठ्या संख्येत गावकरी शेतकरी सहभागी झाले होते.