गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणूकांमध्ये शिस्त लावण्याचा प्रयत्न सातारा पोलिसांनी केला असून अशीच शिस्त आणि कारवाईचे सातत्य वर्षभर असावे, अशी लेखी अर्जाद्वारे विनंती सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिक संघटनांनी गुरुवारी दुपारी १ वाजता सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे केली आहे. यावेळी शहरातील १७ ज्येष्ठ नागरिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.