आंतरराष्ट्रीय देवस्थान श्री क्षेत्र शिर्डी येथे डीवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेलवर छापा टाकून ४ हॉटेल सील केले आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहरातील चार हॉटेल्सना एक वर्षासाठी सील करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी या हॉटेल्सवर पीटा अंतर्गत कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर पोलिस प्रशासनाने न्यायालयात अहवाल सादर केला होता.