20 ऑगस्टला नागपूर शहरातील छापरूनगर चौकात भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या भव्य दहीहंडीच्या उत्साहाला असामाजिक तत्त्वांचे गालबोट लागले. दहीहंडी सुरू असतानाच तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आणि दोन गटात हाणामारी देखील झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये युवक एकमेकांना मारताना दिसत आहे.