सदर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी पाटील यांनी 2 सप्टेंबरला दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे सदर हद्दीतील राजनगर येथे एका ठेकेदाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळ जणक घटना घडली. याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून मृतक ठेकेदारावर कर्जाचा बोजा होता. त्याचे करोडो रुपयांचे बिल शासनाकडे थकीत होते आणि याच तणावातून त्याने आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा