राष्ट्राच्या प्रगती करीता साक्षर नागरीकांची आवश्यकता असते.वैयक्तिक व सर्वागिण विकासासाठी साक्षर होणे महत्वाचे आहे.साक्षरतेविषयी जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास जागतिक साक्षरता दिनानिमित्त मासळ येथे सुबोध विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ग्रंथ दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ताळ मृदंगाच्या तालावर साक्षरतेचे गिते सादर करीत गावातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण केले.