फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्ष अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. कोलकाता येथील महिलेच्या फिर्यादीवरुन मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.