गडचिरोली - समता सैनिक दलाच्या गडचिरोली शाखेच्या १५७ कार्यकर्त्यांनी २३ सप्टेंबर २०२५ रोजी गुजरातच्या बडोदा येथील संकल्प भूमी (सयाजी बाग) येथे मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे आयोजन समता सैनिक दल संकल्प भूमी ट्रस्ट आणि विविध संघटनांनी केले होते.या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व कार्यकर्त्यांनी मानवंदना दिली. या संकल्प भूमीचे महत्त्व म्हणजे, परदेशातून शिक्षण घेऊन परत आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा येथे नोकरी केली, तेव्हा त्यांना जातीय भेदभावाचा अनुभव आ