महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळावा आणि राज्यातील पोलिसांना केवळ आठ तासांचीच ड्युटी लागू करण्यात यावी, या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी स्वतःच्या राहत्या घरी 22 सप्टेंबर 2025 रोजीपासून आंदोलन सुरू केले आहे. पाटील यांनी इशारा दिला आहे की, “जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या 2 ऑक्टोबर 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील कुठल्याही मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” अशी माहिती दिली.