नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाटात रात्रीच्या वेळी एका चालत्या अवजड वाहनाच्या पाठीमागील ताडपत्री कापून त्यातील माल लंपास करणाऱ्या संशयीतांना दिंडोरी पोलीसांनी ताब्यात घेतले. ट्रकचालकाच्या फिर्यादीवरून पोलीसांना पाळत ठेवत व माहितीच्या आधारे संशयीतांना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.