मधुबन कॉलनीत भूमिगत नाली कामाचा शुभारंभ; नागरिकांच्या सोयीसाठी सकारात्मक पाऊल आज दिनांक 11 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मधुबन कॉलनी परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत भूमिगत नाली बांधकामाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. नगरसेविका सौ. संध्या संजय देठे यांच्या प्रयत्नातून व जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम मंजूर झाले असून, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांच्या शुभहस्ते भूमिपूजन प