फलटण तालुक्यात श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणानिमित्त फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु न देता गणेश उत्सव शांततेत पार पाडावेत या दृष्टीने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे करुन सामाजीक स्वास्थ बिघडवणारे, दंगा गोधळ करणारे १४ गुन्हेगारांना उपविभागीय अधिकारी फलटण यांचे आदेशानुसार तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी दिली. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी माहिती दिली.