गव्हाड येथे शेतीच्या वादातून परस्परविरोधी तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता घडली.हिंगणे गव्हाड येथील रहिवासी असलेले मनोहर ओंकार सपकाळ व ज्ञानेश्वर उखर्डा सपकाळ यांच्यामध्ये ७ सप्टेंबर रोजी शेतीच्या वादातून बाचाबाची झाली.बाचाबाचीनंतर दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या.