इयत्ता नववीतील नापास झाल्याने 16 वर्षीय विद्यार्थ्याने शेतात फवारणीसाठी वापरले जाणारे विषारी औषध प्राशन केले त्याला उपचारासाठी कामठी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान 10 सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव मध्यप्रदेश शिवनी निवासी पियुष हिराकणे असे सांगण्यात आले आहे. तो नापास झाल्यामुळे नेहमीच तणावात राहायचा. या तणावातूनच 9 सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास शेतात जाऊन त्याने विषारी औषध प्राशन केले.