वाशिम शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकीत दि. 06 सप्टेंबर रोजी आ. शाम खोडे यांनी सहभागी होवून शहराचा मानाचा क्रं. 1 चा गणपती असलेला शिवशंकर गणेश उत्सव मंडळ व त्यानंतर प्रत्येक मंडळात हजेरी लावत मंडळाच्या पदाधिकार्यांबरोबर विविध गाण्यावर व ढोलताशांच्या तालावर ठेका धरला. गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये पारंपारीक वाद्यांचा गजर, महिलांचा प्रतिसाद, तरुणाईचा उत्साह याचबरोबर लेझीम पथक, डिजेवर थिरकणारे मंडळे दिसून आले.