झोपडपट्टी धारकांना पी.आर. कार्ड व घरकुल योजनेचा लाभ द्या; सकल मातंग समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.. जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना शासनाने हक्काचे पी.आर. कार्ड देण्याबाबत निर्णय घेतला असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत सकल मातंग समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कन्हैयानगर, लालबाग, खांडसरी, हनुमान घाट, मुर्गितालाब, संभाजीनगर आदी झोपडपट्ट्यांतील रहिवाशांना तातडीने पी.आर. कार्ड वाटप करून रमाई आवास घरकुल योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी आज दि.02 मंग