अहेरी तालुक्यातील कमलापूर जवळच्या ताटी गुडम या गावात एका विहिरीत मागील सहा महिन्यापासून गरम पाणी येत असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली सदर घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात कुतूहलाचा विषय असून ग्रामस्थांमध्ये सुद्धा विविध चर्चांना उधाण आले आहे.आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य विभागाच्या सदर विहिरीला भेट देऊन सदर पाण्याचे नमुने घेतले असून सदर विहिरीतील पाणी गरम का आहे याचा लवकरच उलगडा होणार आहे.