गोविंद नगर लोणखेडा येथील राहणारे जगदीश पाटील यांच्या घरातून 40 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात इसमाने चोरून नेले आहे याबाबत दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजून 49 मिनिटांनी जगदीश पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पुढील तपास पोलीस नाईक अविनाश कोकणी करीत आहे.