नागपूर-रत्नागिरी शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार असून, हा महामार्ग आपल्या चंदगड मतदारसंघातून जावा, यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी सरकारकडे मागणी केली आहे. मात्र त्यांच्या या निर्णयाला विरोध करत आज सोमवार, दिनांक ७ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता चंदगड येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली.