ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ आयोजित भव्य‘तिरंगा यात्रा’ रॅली आज काढण्यात आली. या तिरंगा यात्रेतून सैन्यदलाच्या शौर्याला सलामी देत, दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याची कामगिरी करणाऱ्या आणि दहशतवादी तळ उध्वस्त करणाऱ्या भारतीय सैन्यदलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रभक्त नागरिकांनी भव्य तिरंगा यात्रा काढली