दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दिनांक 20 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता दरम्यान रेल्वेच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांच्या परिवाराला एक कोटी रुपये मदत देण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे यवतमाळ वाशिम लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनी दि. २२ ऑगस्टला दुपारी १ वा. दरम्यान दारव्हा उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.