समृध्दी महामार्गावरील चॅनल क्रं. 191 वर झालेल्या भीषण अपघातात पती पत्नी गंभीर जखमी झाले. सदर घटनेची माहिती समृध्दी रुग्णवाहिका पायलट उल्हास खिल्लारे व डॉ. सचिन आडोळे यांना मिळताच त्यांनी जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू त्यांची प्रकृती गंभिर असल्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरीता अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती रुग्णालयाकडून दि. 13 सप्टेंबर रोजी देण्यात आली.