गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'आयकॉन सलून'वर छापा टाकून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका केली.पोलिसांना या सलूनमध्ये देह व्यापार चालत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सलूनवर छापा टाकला. यावेळी, पोलिसांनी सलूनचा मॅनेजर रणजित हलदार याला जागेवरच अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून १६,५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.