उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आषाढी वारी निमित्ताने २ जुलै रोजी पालखी सोहळा रिंगण पार पडला,पालखी सोहळ्याची भक्तिमय वातावरणात उदगीर शहरातून मिरवणूक काढण्यात आली,या पालखी मिरवणुकीत उदगीर शहरातील शालेय विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,पालखी मिरवणुकी दरम्यान उदगीर शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता, छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोड्याचा व मेंढ्याचा रिंगण सोहळा पार पडला